महेश हांडे यांच्या वाढदिवसा निमित्त लोहगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप





  बिलोली - साहेबराव दावलेकर

तालुक्यातील आजनी येथील युवा सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील हांडे यांच्या वाढदिवसा  निमित आज दि.०१ जानेवारी शनिवार रोजी लोहगाव येथिल जि.प.कें. प्रा. शाळेत आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जवळपास चारशे विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी यादराव कोरनुळे तर प्रमुख पाहुणे पञकार संघाचे जिल्हाअध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर भ्रष्टाचार निर्मुलन समिती जिल्हाअध्यक्ष शंकरराव मावलगे उपसरपंच व्यंकटराव नाईनवाड, नागेश मुकदम ,बाबु पा.शिवशेट्टे , गजानन चिंतले,परशुराम मंगरुळे ,श्रीनिवास बोमनाळे सर,व्यंकट भोगाजे सर,बाळु जगडमवार, चंद्रकांत उमरे, विकास शिरसागार आदि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना साहित्याचे वाटप करण्यात आले 






यावेळी शंकरराव मावलगे ,यादवराव कोरनुळे, नागेश मुकदम, कोंडावार मु.अ ,गजानन चिंतले यानी वाढदिवसाचे औचित्य साधुन विद्यार्थ्याच्या  शैक्षणिक गुणवतेसह  कोरोना संकट काळातील शासन निर्णयाच्या नियमाचे पालन आदी आशा विविध विषयावर आपल्या भाषणातुन सविस्तर असे  विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे योग्य असे नियोजन संयोजक मनोहर वसमते ,भगवानराव हांडे,कैलास वसमते ,गोपाळ मुरशेटवाड,प्रशांत वाघमारे यानी केले यावेळी केंद्रे मँडम , गव्हाणे मँडम शेख नवाज , गेटकेवार सर , खानापुरकर सर,पाटील सर  ,बुद्दे सर , कोटमड सर यांच्यासह विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होते. यावेळी महेश हांडे याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगी स्वागत करुन वाढदिवसास शुभेच्छा देण्यात आल्या.  तर कार्यक्रमाचे सुञसंचलन संभोड सर गागलेगावकर   यानी केले.व आभार मिरकुटे सर यानी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला