बिलोली तालुक्यात प्रशासन आपल्या गावी मोहीमेस प्रारंभ
साहेबराव दावलेकर
बिलोली तालुक्यातील नागरिकांची विविध कामे तालुका स्तरावरील तहसील कार्यालय संबंधित असतात. या कामासाठी वेळ व पैसा वाया जाऊ नये यासाठी नागरिकांची कामे प्रभावीपणे अंमलबजावणी तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या गावी हे शासकिय उपक्रम बिलोली तालुक्यातील मंडळ लोहगाव याठिकाणी दि. 31 डिसेंबर रोजी प्रारंभ करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी नांदेड मा.उपविभागीय अधिकारी सचिन गिरी व तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार महसुल आर.जी.चव्हाण यांच्या नियोजनात संपन्न झाले.
बिलोली तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणी एकाच ठिकाण्याहुन सोडविता याव्यात हा उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी दिनांक 31 डिसेंबर रोजी वेगवेगळ्या कार्यालयाचे कामे करून मूळ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत माता प्रसूतीदरम्यान सोबत असलेल्या व्यक्तीस मजुरी स्वरुपात धनादेशाचे वाटप लोहगावचे महिला सरपंच यांचे हस्ते वाटप करण्यात आले.. तसेच आजादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने सुद्धा माननीय सरपंच महोदय लोहगाव यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय सदस्य, उपसरपंच यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात आले. व सर्व शेतकऱ्यांना सातबारा मध्ये
काही चुका असल्यास आपल्या सुचना संबंधित तलाठ्याकडे लेखी स्वरूपात सादर करणे बाबत आवाहन करण्यात आले. सर्व वयोवृद्ध माता-भगिनींना सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये पूर्ण कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुद्धा घेण्यात आली कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेत चाणक्य नायब तहसीलदार आर.जी.चव्हाण नायब तहसिलदार महसुल, पंचायत समिती गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालकल्याण विभागाचे अधिकारी, भुमी अभिलेख, कृषी विभाग, वन विभाग,गट शिक्षण अधिकारी, विस्ताराधिकारी, महावितरणचे उपअभियंता यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी गावचे काही व्यक्ती लस घेतले व महिलांना राशन कार्ड, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र देण्यात आले.
Comments
Post a Comment