महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ.मिनाक्षी कागडे यांची निवड
माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील रहिवाशी असलेल्या व बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव तथा,महाराष्ट्र व पंजाब राज्याच्या प्रभारी आ.ममता भुपेश यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली त्यात नांदेड जिल्ह्यातील एकमेव माजी जिल्हा परिषद सदस्या सौ डॉ. मीनाक्षीताई कागडे यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे
तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी सौ डॉ मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक गावासह परिसराचा विकास केला होता ह्या नांदेड जिल्हा परिषदेच्या व जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या म्हणूनही चांगल्या प्रकारे काम केले जनहितासाठींच्या विविध प्रश्न निवारणासाठी डॉ कागडे मॅडम ह्या सदैव प्रयत्नशील असल्यामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कर्तव्यतत्पर असल्याने महिला सक्षमीकरण सोबतच,पक्ष संघटन वाढीसाठी त्यांचे योगदान मोठया प्रमाणात आहे
त्यांच्या कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,तथा नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत वर्णी लावल्यामुळे त्यांच्या शिफारशीनुसार यांची प्रदेश प्रभारी आ.ममता भुपेश यांनी आपली प्रदेश सचिवपदी निवड केली असून त्यांचा विश्वास सार्थ ठरवित आगामी काळात पक्ष संघटन वाढीसाठी निश्चितच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित प्रदेश सचिव डॉ. मीनाक्षी कागडे यांनी दिली आहे कृष्णूर येथील रहिवाशी असलेल्या सौ डॉ.मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेस कमिटीवर नांदेड जिल्ह्यातून एकमेव प्रदेश सचिवपदी वर्णी लागल्याने
त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असून माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,माजी आ.अमिताभाभी चव्हाण,माजी पालकमंत्री डि.पी.सावंत,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, आ.अमरनाथ राजूरकर,महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीच्या अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे,आ.माधवराव पाटील जवळगांवकर,आ.मोहनराव हंबर्डे,आ.जितेश अंतापूरकर, नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा.नागेलीकर,नांदेड जिल्हा परिषदेच्याअध्यक्षा सौ.मंगाराणी अंबूलगेकर, महापौर सौ.जयश्री पावडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगांवकर,माजी महापौर सौ.शीलाताई भवरे,माजी महापौर मंगला निमकर,महिला कॉग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर,माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,उद्योजक मारोतीराव कवळे गुरुजी,जिल्हा परिषदेचे सभापती संजय बेळगे,माजी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण,कॉग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment