Posts

मौजे गागलेगाव ता.बिलोली जि.नांदेड येथील तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांना ४००० रुपयांची लाच स्वीकारतांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ अटक

Image
बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे   मौजे गागलेगाव ता.बिलोली जि.नांदेड येथील तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांना ४००० रुपयांची लाच स्वीकारतांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ पकडण्यात आले. दिनांक २४/५/२०२१ रोजी त क्रारदार यांनी तक्रार दिली की तक्रारदार अध्यक्ष असलेले श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट मौजे गागलेगाव करिता दान पत्राद्वारे प्राप्त झालेली जमिनीची नोंद ७/१२ ला घेण्यासाठी दिनांक १८/५/२०२१ रोजी पंधरा हजार रुपयांची मागणी करून दहा हजार रुपये त्याच दिवशी घेतले व उर्वरित पाच हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत तक्रारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड कार्यालयाकडून दिनांक २५/५/2021 रोजी पंचांसमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांनी तक्रारदार यांचे उपरोक्त कामासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती चार हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दिनांक २७/५/२०२१ रोजी तहसील कार्यालय बिलोली चे प्रांगण परिसरात लावण्यात आलेल्या सापळ्या दरम्यान तलाठी कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडून उपरोक्त कामासाठी ...

सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता सबसिडीही मिळेना ! बिलोली - वैभव घाटे

Image
 सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता सबसिडीही मिळेना ! बिलोली - वैभव घाटे गँस सिलेंडर च्या दरवाठी मुळे सामान्य कुटुंबा आर्थिक संकटात सापडला आहे ग्रामिण भागात गँस सिंलेडर  शोभेची वस्तू बनवुन राहात आहेत  गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय ? अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे . अगोदरच मोलमजुरी करून गॅस आणावा लागायचा . आता तो गॅस महाग झाल्याने सिलिंडर शोभेची वस्तू होते की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे . ' गेल्या दोन - तीन वर्षापासून सबसिडीच्या स्वरूपात स्वयंपाक गॅस मिळत होता . पण सहा महिन्यापासून सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत याउलट सबसिडी जमा होणे ही वर्षापासून बंद झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींची मोठी अडचण झाली आहे  अशी स्थिती असताना गॅसची भाववाढ सातत्याने होत चालली आहे . परिणामी सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले आहे . या महागाईच्या धोरणामुळे नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे . पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी व झाडांची कत्तल रोखण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून होणारा त्रास रोखण्यासाठी केंद्र शासनान...

लाॕकडाऊन काळात शेकडो मजुरांना मिळाला रोजगार* ⚡ हुनगुंदा खाजगी रेती घाटातील रोजगारामुळे कामगारांची चिंता मिटली

Image
* लाॕकडाऊन काळात शेकडो मजुरांना मिळाला रोजगार* ⚡ हुनगुंदा खाजगी रेती घाटातील रोजगारामुळे कामगारांची चिंता मिटली ⚡ रेती ठेकेदाराकडून कोव्हीड 19 नियमांचे तंतोतंत पालन ⚡ घाटात मास्क, सॕनिटायझर पाॕईंट व सोशल डिस्टन्सचे पालन नांदेड प्रतिनिधी (वैभव घाटे)   बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथिल खाजगी रेती घाट गेल्या काही दिवसांपुर्वी चालू झाले असून या घाटात जेसीबी मशीनद्वारे रेती उपसा न करता कामगारांच्या मदतीने रेती उपसा केले जात असल्याने या घाटात शेकडो महिला व पुरूष कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कोरोनाच्या गंभीर काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला असल्याने कामगारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या   वर्षभरापासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहेत, ही कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने गत वर्षी आठ ते नऊ महिने लाॕकडाऊन टाकले होते. या काळात अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती, कारण लाॕकडाऊन असल्याने सर्व व्यवहार, कामे ठप्प होती. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र लाॕकडाऊन उघडू...

हाडाच्या कारखान्यामुळे परिसरात दुर्गधी बिलोली प्रतिनिधी वैभव घाटे

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे बिलोली शहरातील कोंडलापुर मार्गावरील हाडाच्या कारखान्यात जनावाराची हांडे महाराष्ट्र व तेंलगणा राज्यातुन आयात करुन त्या हाडावर प्रकिया करुन त्या हाडांचे पावडर  दुसऱ्या राज्यामध्ये विक्री साठी नेतात कारखान्याच्या परिसरात दुर्गधी येत आसुन परिसरातील नागरिकांना यांचा मोठा मनस्ताप होत आहे बिलोली शहरापासुन दोन कि मी अंतरावर हा  कारखाना आहे  कोंडलापुर नाग्यापुर  सुलतानपुर ग्रामपंचायत हाद्दीतील हा मला मोठा कारखाना उभा करण्यात आला तेंलगणा राज्यातुन दररोज दोन ते तिन ट्रक जनावाराचे हाडे बिलोली शहारातुन कारखान्यात नेले जातात  शहरातुन जात आसताना मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली जात आहे या कडे संबंधित प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थपुर्ण संबधामुळे गप्प आहे   अशा कारखान्यावर जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ जातीने लक्ष घालुन अशा कारखान्याना महाराष्ट् शासन प्रदुषण  मंडळाची परवानगी देवु नये अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे

मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली

 बिलोली  प्रतिनिधी   ( वैभव घाटे ) बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे वयाच्या 104 वर्ष 1 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले आज दिं 14 सप्टेंबर 2020 रोजी मारोती मंदीर परिसरा सामोर सर्व गावकर्याच्या वतीन शोकसभा आयोजीत करुन श्रध्दांजली वाहीण्यात आली या प्रसंगी शिवभक्त भिमराव पाटील बावलगावकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता  किर्तनकार भिमराव पाटील रामराव पाटील माणिकराव पाटील यांच्या हास्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करुन आदरांणजली वाहीण्यात आली यावेळी रामराव पाटील माणिकराव पाटील हाणमंतराव पाटील मारोती पाटील गोविद पाटील शिवराज पाटील विश्वनाथ महाराज शिवकुमार मोठे नागनाथ पाटील बसवंत पाटील इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती अन्नदान करुन सर्व गावकरी मंडळी च्या वतिन महाराज श्रध्दांजली वाहीण्यात आली शासनाने दिलेल्या सुचनेचा काटेकोर पणे पालन करुन शोकसभा संपन्न झाली

फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची वसुली थाबवण्याची इंद्रजीत डुमणे गागलेगावकर याची मागणी नांदेड प्रतिनिधी -

Image
 कोरोना व्हायरसने जगात धुमाकुळ घातलेला आहे दिवसें दिवस रुग्नाची संख्या वाढत चालली आसताना  .तसेच मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 17 मे पर्यंत  लाॅकडाउन घोषीत केलेला आहे . संचार बंदी लागु असतानां सुध्दा मायक्रो फायनांन्स कंपनीचे कर्मचारी गावो गावी फीरत आहेत  लोकांच्या हाताला कामे नाहीत कसेतरी आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा परिस्थितीत लोक कसे मायक्रो फायनांन्सचे  पैसे भरतील विनाकारण लोकांना ञास देण्याचा प्रयत्न या कंपनीकडुन केल्या जात आहे.तेव्हा प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवुन लाॅकडाऊनच्या काळात या मायक्रो फायनांन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांना गावो गावी फीरु देवु नये   फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची  वसुली पुढील पुढील तिन महीणे थांबवण्यात यावी अशी,मागाणी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित डुमने यांनी केली आहे .

बिलोली येथील रक्तदान शिबिरात 66 जणांनी केले रक्तदान

Image
 बिलोली प्रतिनिधी  (वैभव घाटे)  शहरातीलच पंचायत समिती येथे  यूद्ध कोरोणाशी ग्रुप बिलोली व तालूका प्रशासन यांच्या  संयूक्त विद्यमानाने जीवन आधार रक्तपेढी नांदेड मार्फत रक्तदान शिबिर दि 4 एप्रिल रोजी संपन्न झाले असून 66 रक्तदात्यानी रक्तादान केले. भारतात कोरोना विषाणू ने भारतात घातलेला थैमान लक्षात घेऊन भारत सरकारने केलेल्या आव्हानाला स्विकारुन कोरोना ग्रस्थांना रक्ताचा पुरवटा करण्यासाठी युद्ध कोरोनाशी ग्रुप व बिलोली तालूका प्रशासन कडून अव्हान करण्यात आले होते.  शिबिरात शहर व तालूक्यातील गणेश मंडळाचे सदस्य ,शिक्षक ,शासकीय कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी ,सह महिलांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणचे सगरोळी येथील मारोती पा.कुरुडगे यांच्या  कुटुंबातील 12 सदस्य व  श्रुती एच पि गँसचे कर्मचारी सह अनेकजन सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी बिलोली प्रशासनाचे तहसिलदार विक्रम राजपुत व नायब तहसिलदार ओम प्रकाश गोंड ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नायक ,यूद्ध कोरोनाचे प्रमुख इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदि...