Posts

आरोग्य विभागाची अनास्था डासांचा प्रचंड प्रादुर्भाव डेंगू सदृश्य तापाने नागरिक वैतागले अज्ञात रोगाने जनता त्रस्त

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क बिलोली प्रतिनिधी :- नागेश इबितवार  सध्यातरी कोरोना संसर्ग रोगाला लगाम बसला तरी डेंगू सदृश तापाने लहान-मोठे नागरिक कमालीचे धास्तावले आहे त्यात अज्ञात रोगाने जनता त्रस्त आहे आता पर्यंत कोरोना च्या भीतीने जनता भयभीत होती ती कुठे गेली की आता घराघरात ताप सर्दी खोकला डोके दु:खी पाठ दु:खी टायफॉईड निमोनिया डेंगू सारख्या आजारात प्रचंड वाढ झाली असून या परिसरात सरकारी दवाखाने बरोबरच खाजगी दवाखाने सुद्धा फुल गर्दी दिसून येत आहे याचा फायदा खाजगीत डॉक्टर मेडिकल यांचे चांगभल होत असताना रुग्णांची लूट सुद्धा केल्याचे दिसून येते येथे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचारी डॉक्टराने गावोगावी भेटी देणे गरजेचे बनले आहे त्यात गावागावात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे ठीक ठिकाणी गावात नाल्याची सफाई नाही नाल्या तुंबून गेल्या नाल्याचे खराब पाणी रस्त्यावरून वाहत आहे यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे आरोग्य विभागाने तातडीने डासांचे निर्मूलन करण्यासाठी उपाय योजना करावी व ग्रामपंचायतीने धूर फवारणी करावी आणि खाजगी विहिरीत निर्जतुनाषक पावडर टाकून बिमारीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे या भ...

कुंडलवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पठाण यांना अवैध व्यवसायाचे आव्हान

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - नागेश इबितवार विषेश पोलिस महानिरीक्षक निसार ताबोळी यांच्या आदेशाने येथील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे यांची बदली परभणी जिल्हात झाल्याने येथील पोलिस ठाण्याचे पदभार कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांना देण्यात आले व ते कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारले  परंतू ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पाय पसरले आहेत. शहर व परिसरात चालू असलेले अवैध धंदे बंद करण्यात पठाण यांना यश मिळेल का ? पठाण यांनी अवैध धंदेवाल्यांचे आव्हान स्वीकारून ते बंद करतील का  याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागून आहे. अवैध वाळू तस्करी,आदीसह सर्वच अवैध धंदे पोलिसांचा आशीवार्दाने चालतात स्वतः धंदा चालवणारे आम्ही पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांना हप्ता देवून परवानगी घेवून धंदा चालतो असे बोलून दाखवतात.तरी असे अवैध धंदे व धंदेवाले पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात पाय पसरविले. यामुळे अनेक तरूण पिढी व्यसनाधीन होवून आपले जीवन गमविले आहेत. व व्यसनाधीन होत चालेले तर अनेक नागरिक कर्जबाजारी होवून त्यांचे संसार उघड्यावर आले व येत आहेत.नाईलाजाने...

बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा फज्जा!

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - वैभव घाटे देशात कोरोना विषाणूचा सार्‍याच घटकांवर परिणाम झाला. त्यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ‘ऑनलाईन’ शिक्षणावर भर दिला जात असला, तरी ग्रामीण भागात बिकट परिस्थिती आहे. तिकडे 70 टक्के पालकांकडे ‘अ‍ॅण्ड्राईड’ भ्रमणध्वनी नाही. आसेल तर नेटवर्क नसल्यामुळे  या शिक्षणाचा फज्जा उडाला आहे  शिक्षक गृहभेटी घेऊन ज्ञानार्जनाचा प्रयत्न करण्याच्या सूचना आहे. मात्र, त्यातही विविध अडचणी असून,     शासननिर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी ‘ऑनलाईन’ शिक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ग्रामीण भागातील 70 टक्के पालकांकडे ‘अ‍ॅण्ड्राईड’ भ्रमणध्वनींची वाणवा आहे. काहींकडे साधा भ्रमणध्वनी, तर काहींकडे भ्रमणध्वनीच नसल्याची बिलोली तालुक्यात ग्रामिन भागात आँनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे 

मौजे हज्जापुर येथील सरपंच सागरबाई चंदनकर यांनी घरपट्टी वसुल करुन पैसाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करा नागोराव होनपारखे

Image
◆ उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड,गटविकास अधिकारी पंचायत समिती,बिलोली व तहसीलदार कार्यालय,बिलोली यांना नागोराव होनपारखे यांनी हज्जापुर येथील सरपंच सागरबाई  चंदनकर यांच्या विरोधात दि.२५ ऑगस्ट २०२१ रोजी केली.निवेदनाव्दारे लेखी तक्रार.. .. बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - वैभव घाटे बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या मौजै हज्जापुर  ग्रामपंचायत येथील सरपंच सौ.सागरबाई शिवाजी चंदनकर यांनी गावात ग्रामसेवक तानाजी हांडे उपस्थित असताना सुध्दा त्यांना न विचारताच गावातील अनेक लोकांच्या घरपट्टया वसुली करुन त्या पैसाचा गैरव्यवहार केल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना सरपंच पदावरून कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणीचे नागोराव होनपारखे यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय,नांदेड,गटविकास अधिकारी पंचायत समिती,बिलोली व तहसीलदार कार्यालय,बिलोली यांच्याकडे केली आहे. निवेदनकर्ता नागोराव केरबा होनपारखे रा.मौजे हज्जापुर येथील रहिवासी असुन मौजे हज्जापुर ग्राम पंचायत येथील सरपंच सौ.सागरबाई शिवाजी चंदनकर यांन...

बेरोजगार दिव्यांगांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी देत राजपत्रित अधिसुचना पत्राचे दहन करून केले पंतप्रधानांना निवेदन सादर.

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क  नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-  सरकारी नौकरीमध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि या संदर्भातील राजपत्रीत अधिसूचना हि नुकतीच जारी केली असुन यानुसार आता दिव्यांगांना आयपीएस, पोलिस दल, रेल्वे संरक्षण दल यासारख्या सरकारी सेवांमधील नियुक्त्यामध्ये चार टक्के मिळणारे आरक्षण रद्द करण्यात आले आहे आणि हा जाचक जुलमी निर्णय महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील दिव्यांगांवर घोर अन्याय करणारा आहे आणि भविष्यात या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सर्व घटक राज्ये हि असेच निर्णय घेऊन दिव्यांगांना हक्काच्या चार टक्के आरक्षणापासुन दुर ठेऊ शकतात आणि भविष्यात दिव्यांगांना शासकीय नौकरी असो वा निमशासकीय नौकरी असो ती मिळणारच नाही त्यामुळे असा प्रकार भविष्यात घडु नये यासाठीच आज दि 23 आँगस्ट 2021 रोजी कमल फाउंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड आणि संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड यांच्याकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुल साळवे यांच्या नेतृत्वात राजपत्रित अधिसुचना पत...

बैलचोरी करणाऱ्या चार आरोपींना कुंडलवाडी पोलिसांनी केली अटक

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क -  नागेश इबितवार बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या मौजे कऱ्हाळ येथील फिर्यादी नामे मधुकर नागनाथ वजीरे वय ४० वर्ष व्यवसाय शेती रा.मौजे कऱ्हाळ ता.बिलोली जि.नांदेड  यांच्या शेतातील गोठ्यात दोन बैल बांधून असताना दि .१६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ०९:३० ते दि.१७ ऑगस्ट २०२१ च्या  ०४: ०० वाजताच्या सुमारास फिर्यादीचे शिवार गट क्रं ७० मधील  दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी मौजे कऱ्हाळ ता.बिलोली जि.नांदेड यांच्या शेतातील गोठ्यातुन अज्ञात ईसमाने दोन बैल किमंती ५००००/- रुपयांचे चोरुन नेल्यावरून पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे गुरन.९ ४/२०२१ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा अज्ञात ईसमाविरुद्ध दाखल होता  व गुन्हयाच्या आरोपींने घटनास्थळावरुन दोन बैल चोरुन नेले होते. अश्याही परिस्थीतीत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,उप विभाग धर्माबाद यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश .ई मान्टे,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,पोलीस नाईक महेश माकुरवार ब.न. ७२४,पो.काँ च्यापलवार ब.न.१८३,पोकाँ शेख नजी...

हुनगुंदा रेती घाटातील अमर्याद रेती उपसा प्रकरणी विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

Image
बिलोली टाईम्स न्युज प्रतिनिधी        बिलोली तालुक्यातील मौजे हुनगुंदा रेती घाटातील गट क्र.३३४ मधून अमर्याद वाळू उपसा केल्याप्रकरणी एम किरणकुमार अप्पा रेड्डी यांना अटक करून मंडळ अधिकारी श्री मेहत्रे आर.एस,तलाठी चमकुरे जी.एन,देवकांबळे एस.बी,बिराजदार बी.एन,धारकर व्ही.पी यांना कायमस्वरूपी निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी विभागीय आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड,उपविभागीय अधिकारी बिलोली,व तहसीलदार यांना दिला होता.याबाबीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना पत्र जा.क्र.१३४६ दिनांक.२०/०७/२०२१ नुसार चौकशीचे आदेश दिले आहेत.            सविस्तर वृत्त असे की,बिलोली तालुक्यातील मौजे हुनगुंदा रेती घाटातील गट क्र.४३४ मध्ये अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार प्राप्त होताच बिलोलीचे तहसीलदार श्री कैलाशचंद्र वाघमारे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश जा.क्र.२०१७ मशाका/-२-गौख-...