" द " इंडियन सिंघम आयपिएस पोलीस ऑफिसर अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या कडून अवैध धंदे करणाऱ्याचे थेट ऑपरेशन
माधव पवार
बिलोली येथे गेल्या चार ते पाच महिन्याखाली कार्यभार हाती घेतलेले व अवैध धंदे करणाऱ्याना सळो की पळो करून सोडणारे " द " इंडियन आयपिएस पोलीस ऑफिसर सिंघम अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले यांच्या बरोबर कुंटूर पोलीस ठाण्याची पोलीस टीम उत्कृष्ट पणे काम करीत असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे थेट ऑपरेशन करण्यात येत असल्यामुळे आयपीएस अर्चित चांडक यांच्या दमदार कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्याना चांगलीच वचक बसली असल्यामुळे गरमा गरम धंद्याचा थंडगार पणा झाल्याचे नायागांव तालुक्यात दिसून येत आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकाऱ्याची अवैध धंद्यावर म्हणजे मुरुमा बरोबर गोदाकाठचे सोने म्हणजे माती व दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खलन होत असताना सुद्धा सदरच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी जबाबदारी बाजूला सारून उत्खनन करणाऱ्या टोळ्यावर ठेवत नसल्यामुळे मोठया प्रमाणात महसूल प्रशासनाची लूट होऊन महसूल बुडत असल्यामुळे सदरच्या कारवाई अपेक्षित असताना ही महसूल प्रशासन अवैध उत्खनन करणार्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे "द" इंडियन आयपीएस पोलीस ऑफिसर सिंघम अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिसाचे अवैध धंदे करणाऱ्याचे थेट ऑपरेशन करीत असल्यामुळे अवैध धंदे करणारे मात्र दंग ? झाल्याचे दिसून येत आहे
तालुक्यातील मौजे बरबडा येथे एका वीटभटी धारकानी अधिकृत रॉयल्टी असल्याचे सांगून रात्रीच्या वेळी ११ ट्रॅक्टर व एक जेसीबी एंगेज प्रमाणे लावून एकूण दोनशे ते अंदाजे तीनशे ब्रास साठवून ठेवलेले मातीचे सोने अवैधरित्या वाहतूक व उत्खलन होत असल्याची खात्री दायक माहिती "द" इंडियन आयपीएस पोलीस ऑफिसर सिंघम अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिसाना मिळताच घटनास्थळी जावून थेट ऑपरेशन केल्यामुळे मारलेल्या धाडीत आकारा ट्रॅक्टर व एक जेसीबी मिळून आल्याने वीटभटी मालकसह ट्रॅक्टर चालकावर कुंटूर पोलीस ठाण्यात बरबडा सज्जाचे तलाठी विलास गुंजकर यांच्या फिर्यादी वरून वीटभटीचे मालक शेख इब्राहिम शेख हबीब यांच्या तेरा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला
" द " इंडियन आयपिएस पोलीस ऑफिसर सिंघम अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या कडून अवैध मातीचे असो की मुरुमाचे असो अवैध धंद्याना आळा बसावा म्हणून पोलीस अधिकार मारतात जोरदार धाडी महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आयत्या पिटावर मारतात रांगोळी अशीच गत बरबडा येथे निर्माण झाली असून आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले, नायागांव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाचावार, साई सांगवीकर,बरबडा बिटचे जेमादार आर एन निखाते, रुई बु बिटचे जेमादार एस एम कुमरे, एस एन बुद्धेवाड, पोलीस नाईक खंदारे, पोलीस कॉन्स्टेबल सोनकांबळे पोलीस कॉन्स्टेबल अशोक घुमे कारवाई करून ४२ लाख ५६ हजाराचा मु्देमाल जप्त केले आहे
Proud feeling Dear Archit
ReplyDeleteMy blessings will be always with you & will always protect you from any untoward situation. Go ahead bravely.
Maa Tulja bhavani blesses you.