बेटमोगरा येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...*
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती चे मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.28 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक 9:00 वा.झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, या महापुरुषांच्या प्रतिमांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व ध्वजारोहन सह राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच नागेश सोनकांबळे व शिवलींग सोनकांबळे, क्रांती नवलेकर, शितल वाघमारे या बालकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.यावेळी पञकार भारत सोनकांबळे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वपुर्ण प्रसंगाची उपस्थितीतांना आठवण करुन देत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेल्या महान कार्याविषयी व तत्कालीन बहुजानांच्या व...