Posts

बिलोली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- वैभव घाटे यांची मागणी

Image
     बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार  बिलोली तालुक्यात काही दिवसात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सोयाबिन उडीद मुग कापुस या पिकांचे मोठ्या प्रमाणात   नुकसान झाले आहे. सर्वत्र पाऊस आसल्यामुळे नदी नाले तुंटुब भरुन वाहात आहेत  अनेकांच्या शेतातील उभे पिके पाण्याखाली गेलेले आहेत  सतत पडलेल्या पावसामुळे  पिकांचे नुकसान झाले असून अन्य भाजीपाला पिकेही अडचणीत आली आहेत. शेतातील कापुस   सोयाबिन पावसामुळे नुकसान  झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेले आहेत   सध्या कापुस सोयाबिन  नगदी पीक म्हणून पाहिले जाते. अशावेळी पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी झाली आहे . पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन हेक्टरी पन्नस हाजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी वैभव घाटे यांनी मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे यांच्या कडे मेलद्वारे पञ पाठवुन मागणी केली आहे

प्रा.बालाजी गोणशेटवाड यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कारांनी सन्मानित

Image
बिलोली /नागेश इबितवार बिलोली तालुक्यातील मौजे बडूर येथील रहिवासी व नेहरूनगर ता.कंधार येथे असलेल्या वसंतराव नाईक ग्रामिण कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले  प्रा.बालाजी मलराम गोणशेटवाड यांना शिक्षक दिनानिमित्त ता.५ रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत  होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री डी पी सावंत , तसेच दक्षिण नांदेडचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे होते.  माजी खासदार तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याहस्ते जिल्हास्तरीय महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार व सन्मान पत्र देऊन शिक्षक दिनानिमित्त गौरव करण्यात आले.  महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र या संस्थेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव व सर्व संस्थेचे पदाधिकारी दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व विशेष शिक्षक यांना संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करत असते. त्याच प्रमाणे  विद्यार्थ्यांना घडवणारे विशेष शिक्षकांचे पण संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.  प्रा. बालाजी गोणशेटवाड यांना सदरील पुरस्कार मि...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद तन्वीर उद्दीन यांनी दिले शुभेच्छा

Image
 काशिफ देशमुख वालिद अयुब देशमुख यांनी  हैद्राबाद येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग बी टेक पदवी प्रथम श्रेणीत आणि मास्टर्स एमएस पदवी मिळवण्यासाठी आज अमेरिकेला रवाना होत आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष   मोहम्मद तन्वीर उद्दीन यांनी पुष्पगुच्छ देवुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

भुमागौड यांचे निधन

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क बिलोली प्रतिनिधी :- नागेश इबितवार  बिलोली तालुक्यातील बडूर येथील ज्येष्ठ नागरिक,ग्रामपंचायतचे माजी सदस्य भुमागौड राज्यागौड  ईबितवार ( 80) यांचे दि.28 ऑगस्ट रोजी दुपारी 3:00 वाजता दिर्घ आजाराने  निधन झाले दि.29ऑगस्ट रोजी दुपारी 12:00 वाजता. बडूर येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात  येणार आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,सुन,जावाई, नातू ,पणतू आसा परीवार आहे.     

आरोग्य विभागाची अनास्था डासांचा प्रचंड प्रादुर्भाव डेंगू सदृश्य तापाने नागरिक वैतागले अज्ञात रोगाने जनता त्रस्त

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क बिलोली प्रतिनिधी :- नागेश इबितवार  सध्यातरी कोरोना संसर्ग रोगाला लगाम बसला तरी डेंगू सदृश तापाने लहान-मोठे नागरिक कमालीचे धास्तावले आहे त्यात अज्ञात रोगाने जनता त्रस्त आहे आता पर्यंत कोरोना च्या भीतीने जनता भयभीत होती ती कुठे गेली की आता घराघरात ताप सर्दी खोकला डोके दु:खी पाठ दु:खी टायफॉईड निमोनिया डेंगू सारख्या आजारात प्रचंड वाढ झाली असून या परिसरात सरकारी दवाखाने बरोबरच खाजगी दवाखाने सुद्धा फुल गर्दी दिसून येत आहे याचा फायदा खाजगीत डॉक्टर मेडिकल यांचे चांगभल होत असताना रुग्णांची लूट सुद्धा केल्याचे दिसून येते येथे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचारी डॉक्टराने गावोगावी भेटी देणे गरजेचे बनले आहे त्यात गावागावात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे ठीक ठिकाणी गावात नाल्याची सफाई नाही नाल्या तुंबून गेल्या नाल्याचे खराब पाणी रस्त्यावरून वाहत आहे यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे आरोग्य विभागाने तातडीने डासांचे निर्मूलन करण्यासाठी उपाय योजना करावी व ग्रामपंचायतीने धूर फवारणी करावी आणि खाजगी विहिरीत निर्जतुनाषक पावडर टाकून बिमारीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे या भ...

कुंडलवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पठाण यांना अवैध व्यवसायाचे आव्हान

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - नागेश इबितवार विषेश पोलिस महानिरीक्षक निसार ताबोळी यांच्या आदेशाने येथील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे यांची बदली परभणी जिल्हात झाल्याने येथील पोलिस ठाण्याचे पदभार कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांना देण्यात आले व ते कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारले  परंतू ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पाय पसरले आहेत. शहर व परिसरात चालू असलेले अवैध धंदे बंद करण्यात पठाण यांना यश मिळेल का ? पठाण यांनी अवैध धंदेवाल्यांचे आव्हान स्वीकारून ते बंद करतील का  याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागून आहे. अवैध वाळू तस्करी,आदीसह सर्वच अवैध धंदे पोलिसांचा आशीवार्दाने चालतात स्वतः धंदा चालवणारे आम्ही पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांना हप्ता देवून परवानगी घेवून धंदा चालतो असे बोलून दाखवतात.तरी असे अवैध धंदे व धंदेवाले पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात पाय पसरविले. यामुळे अनेक तरूण पिढी व्यसनाधीन होवून आपले जीवन गमविले आहेत. व व्यसनाधीन होत चालेले तर अनेक नागरिक कर्जबाजारी होवून त्यांचे संसार उघड्यावर आले व येत आहेत.नाईलाजाने...

बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा फज्जा!

Image
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - वैभव घाटे देशात कोरोना विषाणूचा सार्‍याच घटकांवर परिणाम झाला. त्यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ‘ऑनलाईन’ शिक्षणावर भर दिला जात असला, तरी ग्रामीण भागात बिकट परिस्थिती आहे. तिकडे 70 टक्के पालकांकडे ‘अ‍ॅण्ड्राईड’ भ्रमणध्वनी नाही. आसेल तर नेटवर्क नसल्यामुळे  या शिक्षणाचा फज्जा उडाला आहे  शिक्षक गृहभेटी घेऊन ज्ञानार्जनाचा प्रयत्न करण्याच्या सूचना आहे. मात्र, त्यातही विविध अडचणी असून,     शासननिर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी ‘ऑनलाईन’ शिक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ग्रामीण भागातील 70 टक्के पालकांकडे ‘अ‍ॅण्ड्राईड’ भ्रमणध्वनींची वाणवा आहे. काहींकडे साधा भ्रमणध्वनी, तर काहींकडे भ्रमणध्वनीच नसल्याची बिलोली तालुक्यात ग्रामिन भागात आँनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे